Private Advt

अधिकृत शासन स्तरावर स्थाननिर्देशांकासाठी निवेदन

 

जळगाव – कांचन नगर भागातील प्ले सेंन्टर जवळील भागाला गेल्या 20 वर्षापुर्वी विलास चौक अशी ओळख लोकभावनेतुन देण्यात आली आहे तसा स्थाननिर्देशांक करणारा नामफलक पण तिथे 20 वर्षापासुन आहे.

हा परिसर विलास चौक म्हणुनच सर्वश्रुत आहे तसेच परिसरातील रहीवासी आपल्या पोस्टल अॅड्रेस तसेच स्थाननिश्चीतीसाठी वापरतात.त्यामुळे या चौकाला महापालिकेच्या महासभेत ठरावातुन अधिकृत शासकीय नामनिर्देशांक म्हणुन मान्यता मिळवण्यासाठी कांचन नगर प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक किशोर बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विकास सोनार,सुनिल सोनार,प्रमोद सोनार,मुकेश पाटील,नारायण विसपुते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.