अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास प्रतिबंध

0

नंदुरबार – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असल्याने विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर जावू नये असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज किंवा अनुषंगिक कामासाठी जिल्ह्याबाहेर जावू नये. अपवादात्मक परिस्थिती किंवा तातडीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक राहील. जिल्ह्याबाहेर असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे व जिल्ह्यात येऊ नये.
चेक पोस्टवरील नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ शासकीय ओळखपत्राच्या आधारे ये-जा करू देऊ नये. असे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Copy