अत्यावश्यक सेवा समिती ठरतेय एसटी चालक, वाहकांना वरदान

7

जळगाव – महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या अधिपत्याखाली स्थापना झालेल्या SAT गृपच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या अत्यावश्यक सेवा समिती तर्फे आपत्कालीन परिस्थितीतही हजारो एसटीच्या चालक/वाहकांना जेवणाची सोय व इतर मदत मिळाली असल्याने ही समिती एसटी चालक/वाचकांना लाॅकडाउन काळात वरदान ठरली आहे.

लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत, तसेच राज्यातील अडकलेल्या नागरिकांना आप-आपल्या गावाकडे विनामूल्य सोडण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असुन त्याची संपुर्ण जबाबदारी एसटी महामंडळाकडे सोपविला आहे. त्या अनुषंगाने राज्यात एसटीची वाहतुक सुरु करण्यात आली आहे.
लाॅकडाउनमुळे सर्वत्र होटेल्स, रेस्टॉरंट व महामार्गावरील ढाबे बंद आहेत. अशा वेळी कर्तव्यावर असलेल्या एसटीच्या चालक/वाहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या अधिपत्याखाली कार्यरत व्हाट्सआप सोशल मिडीया गृप SAT (सेना अॅक्शन टीम) तर्फे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत व सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या सुचनेनुसार “अत्यावश्यक सेवा समितीची” स्थापना करण्यात आली आहे. या समीती मध्ये महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव व सेना ॲक्शन टीम (SAT) च्या जिल्हा समन्वयकांची निवड करण्यात आली राज्य SAT प्रमुख गोपाळ पाटील, राज्य नियंत्रण समीती प्रमुख नुरमोहंमद शेख व कामगार सेनेचे कार्यालयीन प्रमुख रविंद्र चिपळूणकर यांच्यावर राज्याची संपुर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा समिती मध्ये कार्यरत सर्वांचे मोबाईल नंबर सोशल मिडीयावर प्रसारित करण्यात आले असुन अडचणीत सापडलेल्या चालक/वाहकांना एका फोनवर त्यांना जेवणापासुन ते इतर सर्व तांत्रिक अडचणी सोडण्यासाठी तात्काळ मदत मिळत आहे.

विभागनिहाय संपर्क क्रमांक

जर विभागात मदत मिळण्यास काही अडचणी आल्या तर आपत्कालीन परिस्थितीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थेट मुंबई येथील कार्यालयातील कामगार सेना समन्वयक रवी चिपळूणकर 7021133157 गोपाळ पाटील (SAT प्रमुख) 7588687318 नूरमोहोन्मद शेख 8975838855 (SAT नियंत्रण समिती प्रमुख) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केलेले आहे.

Copy