अत्याचारातून पीडीतेने दिला बाळास जन्म : नराधम आरोपीला चोपडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Chopra taluka shaken: Woman gives birth to baby after torture: Accused of murder arrested चोपडा :  दारुच्या नशेत नराधम आरोपीने 36 वर्षीय महिलेच्या झोपडीत शिरून तिच्यावर अत्याचार केला व या प्रकारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म देवून नवजात अर्भकाला बदनामी होईल या भीतीने सोडून दिले होते मात्र पोलिसांनी या प्रकरणी धाव घेत बाळाला ताब्यात घेत मातेचा शोध लावला व पीडीतेच्या तक्रारीनंतर कैलास गोकुळ पाटील या नराधम आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा चोपडा ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

अत्याचाराने चोपडा तालुका हादरला
चोपडा तालुक्यातील एका गावात 36 वर्षीय पीडिता मजुरी काम करून उदरनिर्वाह करते. एका गावातील संशयीत आरोपी कैलास गोकूळ पाटील याने नऊ महिन्यांपूर्वी पीडीत महिलेवर दारूच्या नशेत तिच्या घराच्या झोपडीत येवून अत्याचार केला होता व त्यातून महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने नुकताच पुरूष जातीच्या नवजात बालकाला जन्म दिला. ही बाब समाजात कळाल्यानंतर बदनामी होईल म्हणून पीडीतेने नवजात बालकाला नाल्यात टाकले मात्र पोलिसांनी धाव घेत बालकावर तातडीने उपचार केले. यावेळी रुग्णालयात तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे आदींनी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी पीडीतेचा शोध घेतल्यानंतर मंगळवारी रात्री आरोपी कैलास पाटील विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.