अतिक्रमीत टपरी हटवताना सांगवी खुर्द गावातील महिलेचे विष प्राशन

यावल : तालुक्यातील सांगवी येथील अतिक्रमित टपरी पोलीस बंदोबस्तात हटवत असताना टपरीधारक महिलेने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले. भिमाबाई लक्ष्मण पाटील (55) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे नाव आहे.

महिलेच्या विष प्राशनाने कारवाई थांबली
तालुक्यातील सांगवी येथील विठ्ठल-रूखमाई मंदीराजवळ रवींद्र लक्ष्मण पाटील (सांगवी खुर्द) यांची लहान किराण्याची टपरी आहे. बाजूला मंदीर असल्यामुळे किर्तन सप्ताह व लग्न समारंभचे कार्यक्रम होतात. त्याचप्रमाणे सकाळी आरती होते. टपरीबाबत स्थानिक रहिवासी यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने किरणा दुकान मालक रवींद्र पाटील यांना टपरी हटविण्याबाबत 3 मार्च, 16 मार्च आणि 22 मार्च रोजी अशा तीन नोटीसा पाठविण्यात आल्या परंतु आजपर्यंत त्यांनी किराणा टपरी न हटवल्याने बुधवारी उपसरपंच आकाश धनगर यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित असलेले दुकान हटवण्यासाठी आल्यानंतर किराणा दुकानदार रवींद्र पाटील यांची पत्नी भिमाबाई लक्ष्मण पाटील (55) यांनी विष प्राशन केल्याने अतिक्रमणाची कारवाई स्थगित करण्यात आली. महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Copy