अतिक्रमण विभागातर्फे भाजीपाला जप्त

0

जळगाव । महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवार 10 फेब्रुवारी शहरात विविध ठिकाणी कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. यात बोहरा गल्ली, तिजोरी गल्ली, महाबळ रोड येथे कारवाई करून अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त केले. यात बोहरा गल्लीत दुकानदारांच्या 3 शेगडी, 1 पेटी, 15 टप, 48 नग झाडू, 2 स्टँड, 2 कपाट, 2 गाड्या, 1 टाकी, 1 बाकडा, 2 कढाई, 6 कलर डब्बे, 1 बंडल नारळदोरी, 5 बंडल नळी, 2 बंडल तुकडे, 14 किलो रंग पॉऊच, 1 तार बंडल, 12 लहान घमेली आदी साहित्य जप्त करण्यात आले.

अनाथआश्रमात दिला भाजीपाला

अतिक्रमण विभागाच्या वीस कर्मचार्‍यांनी या कारवाईत सहभाग घेतला. यासोबतच खारी, स्टोट, संत्री, वटाणे, बीट, लिंबू, हिरवी मिरची, प्लावर, भरताचे वांगे, शेवगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा सारखा भाजीपाला देखील जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेला 1800 रूपयांचा भाजीपाला व फळे शिवकॉलनी येथील लिलाई मुलांचे अनाथाश्रम येथे देण्यात आले.