अतिक्रमण मोहिमे विरोधात नागरिक रस्त्यावर

0

धुळे । शहरातील देवपूर भागात असलेल्या ग.नं.9 मध्ये रमाबाई आंबेडकर नगरात नागरीकांची घरे अतिक्रमण ठरवून पाडण्याचा प्रयत्न होत असून हे काम होवू नये अशी मागणी करणारे निवेदन या परिसरातील नागरीकांनी आज प्रशासनाला देवून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

या निवेदनात म्हटले आहे की, देवपूरातील रमाबाई आंबेडकरनगर ही वसाहत 50 वर्षांपुर्वीची असून स्लम एरिया म्हणून हा भाग जाहीर झाला. या भागातील नागरीक मनपाची घरपट्टी, पाणीपट्टी तसेच वीजबिल भरत असल्याने या नागरीकांना या सुविधा मिळत आहेत. शहराचे आमदार या वस्तीत आहे ती घरे पाडून पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे सांगत आहेत. या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोकांची वस्ती असून नागरीकांना आमदारांचे म्हणणे मान्य नसल्याने त्यांची जुनी घरे पाडू नयेत, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन अधिकारी पंकज चौबळ यांना निवेदन देवून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यात ज्ञानेश्‍वर जगताप, रविंद्र वाघ, दिलीप केदार, सलिम पिंजारी, महंमद शाह, मसुद खान, मुन्ना अन्वर, राजेद्र गवळी, भरत पाटील, गणेश मरसाळे यांच्यासह बहूसंख्य नागरीक सहभागी झाले होते