अतिक्रमण धारकांना नोटीसा; आज पडणार हातोडा

0

पहूर : येथील जळगाव, इंदौर राज्य मार्ग 42 वरील अतिक्रमण त्वरीत हटविण्याबाबत संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीसा बजविण्यात आल्या असून उद्या शुक्रवार 16 रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पहूर बसस्थानक परीसरातील सुमारे 100 अतिक्रमण धारकांना लेखी नोटीसा दिल्या असून दोन दिवसांची मुदत देत अतिक्रमण हटविण्याची सूचना केली आहे. दरम्यान, पहूर बसस्थानक परिसरात 100,125 जण आपले पोट हातगाडी वैगेरे लावून काही लहान मोठा व्यवसाय करुन भरतात. या कारवाई मुळे सदर व्यावसायीकात भीती निर्माण झाली असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.