अतिक्रमणविरोधी पथकालाच हटवले!

0

पाचोरा । येथील स्टेशनवरील रावल जिनातील 49 वर्षाचे जुने जवाहर क्लॉथ सेंटरला अतिक्रमित दाखवून पाडण्यासाठी जेसीबी आणल्यावर व्यापारीच्या कुटूंबासह सिंधी बांधवांनी आपल्या एकतेचे प्रतिक दाखवून नगरपालिकाची कारवाई थांबविण्यात यश मिळविले आहे. शहरात नगरपरीषद रस्त्याच्या नावाखाली बिल्डरशी हात मिळवणी करून अतिक्रमण काढण्याचा उपद्रव सुरू केला असल्याचा अरोप व्यापारी वर्ग करीत आहे. 1968 साली रावल जीनचे भाडेकरून म्हणून सिटी सर्व्हे 2687 साली क्लॉथ सेंटरचे सत्यावंद जवाहरमल यांचे कापडाचा उद्योग सुरू आहे. ज्या जागेत त्यांनी व्यवसाय सुरू कला तीचे मालक देशमुख म्हणून होते. त्यानंतर सद्यस्थितीला रावल यांच्या मालकी झाली आहे. सन 2004 च्या दरम्यान पाचोरा शहराचा नविन आराखडा तयार करून त्या सदर भाडेतत्वाची जागासह नगरपालिकेने बांधलेला टपरी शॉपचे दुकाने डीपी रोड मध्ये मोठ्या हुशारीने टाकण्यात आले.

ठेकेदारांच्या मर्जीतील हुकूमशहा; न.पा. कार्यवाही योग्य?
हा प्लॅन 2014 मध्य पुर्णत्वास आल्यावर या रोडच्या मागील बाजूस नगर परिषदेचे ठेकेदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शनने भागीदारीत मोठे शॉपिंग उभे केल्यावर त्या शॉपिंगचे मुख्य रस्त्याच्या भागावार पालिकेचे टपरी शॉपसह जवाहर क्लॉथ हेच अडचणीचे आहे. त्यामुळे आज 10 एप्रिल 2017 रोजी अचानक नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री. भाटे यांच्या नेतृत्वाखाली श्री. जाधव, संजय ढमाळ यांच्या पथक दुकान तोडण्यासाठी गेल्यावर व्यापारपेठेत एकच खळबळ उडाली होती. जवाहन क्लॉथ यांचे संपुर्ण कुटूंब जेसीबी मशिनच्या समोर आल्यावर एकच खळबळ उडाली होती जवळपास नगरपालिका अधिकारी व दुकान मालकाचे समर्थक यांच्यात दोन तास शाब्दिक चकमक उडाला होती. अखेर पोलिसांसह नपाचे पथक माघारी परतले. या दरम्यान व्यापरीवर अन्याय म्हणून शहरातील इतर सिंधी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती.

दरम्यान दुकान मालकाने गंभीर आरोप केला की, सदरच्या नगरपालिकेचा परपरांगत ठेकेदार लक्ष्मी कन्ट्रक्शन यांनीच रावल जिनातील शॉपिंग चे काम घेतले असून ते एक गाळा 60 ते 70 लाखाला विक्री करत आहे. या गाळ्यांंची विक्री व्हावी यासाठी त्यासाठी रस्ता नसल्याने आमचा भाडेकरून व घरमालक असा वाद असतांना न्यायप्रविष्ठ असतांना देखील नगरपालिका प्रशासनाने डी.पी.रोडचे निमित्त दाखवून 49 वर्षाचे जूने दुकान हलविण्याचा खटाटोप कशाकरीता घ्यावा शहरातील सामान्य व्यापार्‍यांना त्रास देण्याचा हा उपदव्याप आहे. या घटनेबाबत नगरपरिषदेच्या वतीने कर अधिक्षक संजय ढमाळ यांनी म्हटले की, जवाहर क्लॉथ हे दुकान प्रस्ताविक 12 मीटर रस्त्यावर आहे. ते काढून टाकण्याबाबत न.पा.ने यापूर्वी 20 एप्रिल 2016 ला सूचना दिली होती. त्यावर अतिक्रमणधारकाने स्व:ताच्या अतिक्रमीत दुकान असल्याचे कबुल करुन सदर दुकानातील सामान्य इतरस्त्र हलविण्यात करीता 1 महिन्याची मुदत मागितली होती. परंतु अद्याप दुकान काढलेले नसल्याने आज अतिक्रमीत दुकान काढण्याची मोहीम होती घेण्यात आली होती.

न.पा.ची भुमिका संशयास्पद
नगर परिषदेची अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जी पण मोहीम राबवित आहे ती पूर्वत: संशयास्पद असून केवळ कुणाच्या तरी हितासाठीच न.पा. अतिक्रमण मोहीम राबवित असल्याने सामान्य व्यापारी वर्ग हतबल झाला आहे. शहरात भडगावरोड, जामनेररोड अशा अनेक ठिकाणी वाढते अतिक्रमणावर डोळेझाक होत आहे. त्यातच बाहेरपूरा भागात दोन महिला उपोषणाला सातत्याने प्रांतअधिकार्‍यांसमोर बसून त्यांना उपाय व देणारी नगरपालिका केवळ मर्जीतील लोकांसाठीच काम करण्याचा आरोप होत आहे.

पोलिसांच्या खाकीचा वापर
पाचोरा पोलिस स्टेशन येथील न.पा. प्रशासनाला आम्ही बंदोबस्त देवून आपण तात्काळ मोहीम राबवावेचे पत्राला नेहमी केराची टोपली दिली जाते मात्र पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली काही बेकायदेशीर किंवा अर्थकारणाची कामे नगर प्रशासन करीत असल्याचा आरोप होत असून यापुढे पोलिस बंदोबस्त देतांना पोलिस अधिकार्‍यांनी कशासाठी आहे. या दोन तासाच्या दुकान हटविण्याच्या नाट्यमय घडामोडीत व्यापारीने रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी वेळीच रॉकेल डबा हस्तगत केल्याने टळला होता.