अतिक्रमणधारकांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल होणार

0

भुसावळ : शहरात अनाधिकृत बांधकाम करणार्‍यांना 30 दिवसांची नोटीस बजावण्यात येईल व नंतर फौजदारी गुन्हा दाखल करुन बांधकाम तोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बाविस्कर यांनी दिली आहे. शहरात अतिक्रमण वाढले असून यावर्षाच्या सुरवातीला काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. अशा अतिक्रमणधारकांना प्रशासन नोटीस देणार आहे परंतु त्यापुर्वी नैसर्गीक न्यायतत्वानुसार त्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी दिली जाईल. नोटीस देवून त्यांनी अतिक्रमण न काढल्यास फौजदारी गुन्हा दाखल करुन बांधकामावर हतोडा उगारला जाईल. ही कारवाई करण्यापुर्वी शहरातील हॉकर्सची व्यवस्था केली जाणार आहे.शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबीत असून पालिकेतील नविन सत्ताधारी तो शिघ्रतेने पार पाडतील अशी अपेक्षा आहे.