अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचा कोरोनाने मृत्यू

0

कोलकाता: अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसू यांचे करोनामुळे निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ते ६८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोलकातातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. शेखर बसू यांना करोनाबरोबरच किडणीचाही त्रास होता.

अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष राहिलेल्या डॉ. बसू यांना २०१४मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आके गीते. डॉ. बसू हे मॅकेनिकल इंजिनिअर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान होते. डॉ. शेखर बसू यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अणुभट्टी देखील तयार केली होती.

Copy