अडावद सबस्टेशनला भर पावसात आग

0

अडावद: येथील ३३/११केव्ही सबस्टेशनला भर पावसात अचानक आग लागली. या आगीत शेवरे फिडर जाळून खाक झाले आहे.

अडावद येथे ३३/११के व्ही सबस्टेशन आहे, यात शेवरे व वडगाव बु हे दोन फिडरला आग लागली. पाऊस सुरु असताना आगीने काही मिनिटातच रावद्र रूप धारण केले. त्या फिडरमध्ये ऑइल असल्याने पाण्याने आग विझवता येत नाही व गॅस सबस्टेशनला आग विझवण्याचे सिलेंडर नसल्याने आग ही आटोक्यात आली नाही. रात्री उशिरापर्यंत आग सुरूच होती. सबस्टेशनला गॅस सिलेंडर हे शो पीस म्हणून ठेवलेले आहेत. जर गॅस सिलेंडर राहिले असते तर वेळेतच आग आटोक्यात आली असती.

Copy