अडावद येथील ईद ए मिलाद मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी दोघांना अटक

0

चोपडा : तालुक्यातील अडावद येथे ईद ए मिलाद या उत्साहानिमित्त 12 रोजी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.गावातील लाला सारस्वत याच्या कापड दुकानाजवळ आली असता दगड येवून लागल्याने तीन जण जखमी झाले होते.याप्रकरणी मुस्लिम समाजाने गुन्हेगारांवर तात्काळ कारवाईची मागणी केली होती.याप्रकरणी अडावद पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हात पोलिसांनी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

दि. 12 रोजी सकाळी 11.30 वाजेदरम्यान ईद ए मिलाद मिरवणूक लाला सारस्वत यांच्या कापड दुकाना जवळ अचानक दगड येवु लागल्यामुळे पळापळ सुरू झाली होती त्या दरम्यान 3 जण जखमी झाले होते. पोलिसांनी या घटनेच्या तपासाचे चक्र अधिक गांभीर्याने घेत 12 रोजी रात्री 11 वाजेला मयुर दशरथ पाटील ( 20 ) , प्रतिक उर्फ बंटी राजेद्र देशमुख या दोघे तरुणांना अटक करण्यात केली . त्यांना 13 रोजी चोपडा न्यायालयात हजर केले असता दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीमुळे गावात तणावपूर्ण शांतता होती . गावात चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. काही अनुचित प्रकार घडु नाही म्हणून 12 पासुन अप्पर पोलिस अधिक्षक नंंदकिशोर ठाकुर व डिवायएसपी सदाशिव वाघमारे तळ ठोकून होते .या घटनेचा पुढील तपास पिएसआय पंकज शिंदे करीत आहे