Private Advt

अडावदजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जळगावचे दोघे तरुण मित्र ठार

चोपडा : जळगावातील दोघांचा मित्रांचा चोपडा तालुक्यातील अडावद गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चोपडा-यावल रस्त्यावरील अडावद गावाजवळ एस.पी.देशमुख स्कूलजवळ घडला. ईश्वर सुदाम सुरळकर (35, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व योगेश सुकलाल भावसार (34, रा.जगवाणी नगर, जळगाव) अशी मयतांची नावे आहेत.

एकाचा जागीच मृत्यू
जळगावातील विमा प्रतिनिधी ईश्वर सुदाम सुरळकर (35, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व रेमंड कंपनीतील कर्मचारी योगेश सुकलाल भावसार (34, रा.जगवाणीनगर, जळगाव) हे दोन्ही मित्र दुचाकीने (क्र.एम.एच.19 डी.एच.9769) जळगावला जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ईश्वर सुरळकर यांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश भावसार यांचा उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृत ईश्वर सुरळकर याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी दोन मुले असा परीवार आहे.