अडावदच्या कोरोनाबाधीताच्या संपर्कातील 25 जणांचे अहवाल निगेटीव्ह

0

जळगाव – गेल्या काही दिवासांपूर्वी चोपडा तालुक्यातील अडावद येथील कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला होता. या रुग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे संशयितांचे अहवाल आले आहे. येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 25 व्यक्तीचे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Copy