अडकून राहिलेले विद्यार्थी, कामगारांचा घरचा मार्ग मोकळा

0

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या सर्वांना प्रवासाला परवानगी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे. आपल्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्यांना अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. आदेशाप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून, कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

Copy