अठरा वर्षांनी फेसबुकवर प्रियकराची भेट; गुंगीचे औषध देवून केला बलात्कार

0
पिंपरी चिंचवड : लग्नापुर्वी असलेले प्रेमसंबंध तब्बल अठरा वर्षानंतर प्रियकर-प्रियेसीचे सुत फेसबुक जूळून आले. त्यानंतर गुंगीचे औषध देवून प्रियसीचा बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॅार्ड करत सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्या महिलेला ब्लॅकमेल करत एक लाख रुपयाची मागणी केली. ही घटना चिंचवड येथे घडली असून पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आले होते.
एक लाख रुपयाची केली मागणी…
याबाबत माहिती अशी की, आरोपीचे आणि पीडित महिलेचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यानंतर महिला उल्हासनगरला स्थायिक झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क नव्हता. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले होते. दोघांनी एकमेकांचा नंबर घेत पुन्हा भेटण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेला चिंचवड येथे आणून गुंगीचे औषध देत इच्छेविरोधात शारिरीक संबंध ठेवत बलात्कार केला. आरोपीने फोटो काढले तसंच व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला होता. हे फोटो आणि व्हिडीओ भावाला आणि पतीला दाखवेन अशी धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती महिलेने तक्रारीत दिली आहे. तसेच पैसे न दिल्यास व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही आरोपीने दिली होती. महिलेने अखेर चिंचवड पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.