Private Advt

अट्रावलच्या मुंजोबाने घेतला अग्निडाग

यावल : राज्यात प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाने गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अग्नीडाग घेतला आहे. यात्रेनंतर सव्वा महिन्याच्या अवधीतच मुंजोबाने अग्नीचा घेतला. अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान
यावल तालुक्यातील अट्रावल येथील खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मुंजोबाची यात्रा गेल्या महिन्यात माग शुद्ध पंधरवाड्यात पार पडली. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे बंद असलेली यात्रा यावर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत हजारो भाविकांनी यात्रा उत्सव काळात दर्शन घेतले. यात्रोत्सवात भाविकांनी, मुंजोबास अर्पण केलेली पूजा, पत्री, लोणी यात्रोत्सवानंतर आपोआप पेट घेतात यालाच मुंजोबाने अग्नीडाग घेतल्याचे म्हटले जाते. मुंजोबा अग्नीडाग केव्हा घेईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. यावर्षी सव्वा महिन्याच्या अवधीतच मुंजोबाने अग्नीडाग घेतला. अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.