अट्टल मोबाईल चोरटा जाळ्यात

0

भुसावळ : आऊटरवर गाडी स्लो झाल्यानंतर प्रवाशांच्या हातावर दणकट वस्तूने हल्ला करून मोबाईल लांबवणार्‍या अट्टल आरोपीच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहुल तायडे (23, शेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तक्रारदार निलेश जगन्नाथ वाणी (जळगाव) हे 20 मार्च रोजी पठाणकोट एक्स्प्रेसने खंडवा ते जळगाव प्रवास करीत असताना भुसावळ आल्यानंतर आऊटरवर गाडीचा वेग कमी होताच आरोपीने वाणी यांच्या हातावर लोखंडी रॉडने हल्ला करून 58 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मधुकर न्हावकर, नितीन पाटील,जयकुमार कोळी, सिद्धेश्‍वर देशमाने आदींनी गोपनीय माहितीवरून अप कामायनी एक्स्प्रेसमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तपास एएसआय भरत शिरसाठ करीत आहेत.