Private Advt

अट्टल दुचाकी चोरट्यासह दोघे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव :  अट्टल दुचाकी चोरट्यासह चोरीची दुचाकी विकत घेणार्‍याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून संशयीताकडून एमआयडीसी हद्दीत सुमारे चार महिन्यांपूर्वी चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. तस्लीम शेख शब्बीर उर्फ तस्या (28, मदिना कॉलनी, रावेर) व शंकर ज्ञानदेव दहिकार (40, टुणकी, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. संशयीत तस्लीमने सुमारे चार महिन्यांपूर्वी एमआयडीसी हद्दीतून दुचाकी (एम.एच.19 बी.आर.2669) चोरी केल्यानंतर ती संशयीत शंकर दहिकार यास विक्री केली. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. चोरीची मालमत्ता खरेदी करणे गुन्हा असतानासही दहिकार यांनी चोरीची दुचाकी खरेदी केल्याने भादंवि 411 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार रमेश चौधरी, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी आदींच्या पथकाने केली.