अट्टल दुचाकी चोरटा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ : अट्टल दुचाकी चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. समाधान गोकुळ सपकाळे (28, रा.कोळीवाडा, फुकणी, ता.जि.जळगाव, ह.मु.तुकाई दर्शन, हडपसर, जि.पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, अटकेतील आरोपी हा सराईत असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिसात दोन तर हडपसर, पुणे येथे चार गुन्हे दाखल आहेत.

गोपनीय माहितीवरून अटक
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीकत आरोपीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल (गुरनं.0762/2020) व शहर पोलिस ठाण्यात दाखल (गुरनं.0397/2020) मधील अनुक्रमे 35 व 30 हजार रुपये किंमतीची चोरलेली दुचाकी तसेच 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जपत करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चालक हवालदार अशोक पाटील आदींनी केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.