Private Advt

अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात : दोन दुचाकी जप्त

जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्यास चोरीच्या दोन दुचाकींसह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले आहे. रीतेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (23, एमडीएस कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

दुचाकी चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
दिलीप शिवदास गोपाळ (कुसुंबा) यांची दुचाकी लांबवण्यात आल्याने 19 मार्च 2022 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासादरम्यान पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रीतेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याने दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, नाईक विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, गोविंदा पाटील, रवींद्र चौधरी आदींनी त्याला सापळा रचून रामेश्वर कॉलनी परीसरातून अटक केली. दरम्यान, अटकेतील आरोपीविरोधात दुचाकी चोरीसह शरीराविरोधात ईजा केल्याचे तसेच अन्य मिळून 15 गुन्हे ठिकठिकाणी दाखल आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनला 13, जिल्हापेठ पोलिस स्टेशन व रामानंद नगर पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक गुन्ह्यातचा त्यात समावेश आहे. सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.