अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे जे. पी. नड्डा यांच्या हस्ते अनावरण

कांदिवली येथे उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उद्या शनिवार दि. २५ डिसेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक खा. गोपाळ शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कांदिवली पूर्व येथे द्रुतगती महामार्गावर समतानगर पोलीस चौकीजवळ अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथे दुपारी ४.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे