Private Advt

अटकेतील चोरट्यांकडून ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

 

चाळीसगाव | चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोन जणांकडून अजून तीन गुन्ह्यातील ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. आरोपीतांकडून आणखी काही चोरींची उकल होण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेड ब्रु. येथील रामदास धना पाटील (वय-८२) यांचे राहत्या घरातून अज्ञात इसमाने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपासाचा छडा लावून महिलेसह एकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पावणे ४ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आले होते. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे योगेश राजेंद्र कुमावत, (वय २५) व छायाबाई ऊर्फ वर्षा नारायण पाटील, (वय ३३) दोन्ही रा.मुंदखेडे ता. चाळीसगाव अशी आहेत. त्यांची  ग्रामीण पोलीसांनी अधिक विचारपूस केला असता विविध ठिकाणांहून चोरी केल्याचे कबूली दिली. त्याअनुषंगाने
गुरनं. २४५/२०२१ भादंवि कलम- ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्यातील चोरी केलेला ऐवज १२०००/- हजार रुपये रोख व ५५०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने, गुरनं. ३२३/२०२१ भादंवि कलम ३५४, ३८० या गुन्ह्यातील १२००० हजार रुपये किमतीचा एलईडी टिव्ही, तसेच तालुक्यातील पातोंडा व इतर ठिकाणावरुन ५५००/- व ३५००/- रुपयांच्या दोन इलेक्ट्रीक पाण्याचे पंप (मोटार) असे एकूण ८८०००/- हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान आरोपीतांकडून आणखी काही चोरींची उकल होण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जळगांव, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ राजेंद्र साळुंखे, सफौ दिलीप रोकडे, पोहेकॉ नितीन सोनवणे, मपोना मालती बच्छाव पोना शंकर जंजाळे, पोना संदिप माने, पोना मनोज पाटील या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार सफौ राजेंद्र साळुंखे, सफौ दिलीप रोकडे हे करीत आहेत.