अज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखीचा मृत्यू

35 youths were killed in a collision with an unknown vehicle at midnight in Amoda यावल : तालुक्यातील फैजपूर- भुसावळ रस्त्यावर आमोदा गावाजवळ मध्यरात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी 35 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. पोलिसांच्या पथकांनी रात्रीच मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणला. याप्रकरणी आमोदा पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार
फैजपूर-भुसावळ रस्त्यावर आमोदा हे गाव असून गावाजवळ मध्यरात्रीनंतर एका 35 वर्षीत अज्ञात तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली व या अपघातात तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल. फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, चेतन महाजन, विकास सोनवणे, महेश वंजारी, किरण चाटे हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणला. मयत याची ओळख पटली नसून या प्रकरणी फैजपूर पोलिसात आमोदा पोलीस पाटील तुषार चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनधारकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.