अज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू

0

भुसावळ : भरधाव वाहनाने उडवल्याने 50 ते 55 वर्षीय अनोळखीच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्रीसेकम गावाजवळ 7 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक अपघातस्थळावरून वाहनासह पसार झाला. याप्रकरणी सोमवारी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ तालुका पोलिसात स्वप्नील चिंधू पाटील (सुसरी, ता.भुसावळ) यांनी फिर्याद दिली. वरणगाव-भुसावळ रस्त्यावरील पिंप्रीसेकम गावाजवळ 50 ते 55 वर्षीय अनोळखी महिलेला उडवल्याने गंभीर जखमी22 होवून महिलेचा मृत्यू झाला तर अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत. दरम्यान, अनोळखी महिलेची ओळखी पटवण्याचे काम सुरू असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाचाही शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Copy