अज्ञात वाहनाच्या धडकेने मामाचा मृत्यू तर भाचा गंभीर

पाचोरा : अज्ञात वाहनाच्या धडकेने मामाचा मृत्यू झाला तर भाचा गंभीर जखमी झाला. पाचोरा तालुक्यातील हडसन गावाजवळ शनिवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे (40, डोमगाव, ता.जळगाव) असे मयत मामाचे तर सुरेश रतन भील (24, डोमगाव, ता.जळगाव) असे जखमी भाच्याचे नाव आहे.

दर्ग्यावरून परतताना गाठले मृत्यूने
जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील रहिवासी मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे हे त्यांच्याच गावात राहणारा त्यांचा भाचा सुरेश रतन भील हे चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे पीरबाबांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी गेले असता परतीच्या प्रवासात हडसन गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाचा धक्का लागला. या अपघातात मंगल उर्फ पिंटू माणिक सोनवणे ( वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश रतन भील हे अपघातात गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत केली.