Private Advt

अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीटचा मृत्यू

अमळनेर : गडखांब ते दहिवद रस्त्याच्यामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने काळवीटचा मृत्यू झाला.

मृत काळवीटावर अंत्यसंस्कार
मंगळवारी दुपारच्या उन्हात पाण्याच्या शोधात असलेले काळवीट गडखांब ते दहिवद रस्त्याच्यामध्ये मंगळवार, 19 रोजी अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने ठार झाले. तोंडाला आणि कमरेला जबर मार लागल्याने काळवीटचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. वनपाल पी.जे.सोनवणे यांना माहिती कळवण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ वन कर्मचारी पाठवत मृत काळवीट ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी हलवले नंतर मृत काळवीटावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची वनपाल सोनवणे यांनी दिली.