अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस दलाचे विधी अधिकारी ठार

0

जळगाव: राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. बांभोरीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जळगाव पोलीस दलाचे  विधी अधिकारी जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दोन्ही पारोळा येथे कामानिमित्त जात असतांना हा अपघात घडला. जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे दुर्गादासगिरी गोसावी आणि शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत संदीप भीकन पाटील हे आज सकाळी दुचाकीने जळगावहून पारोळ्याकडे कामानिमित्त जात होते. दुचाकीला धडक देणार्‍या वाहन चालकाने घटनास्थळाहून वाहनासह पलायन केले असून आता त्याचा शोध घेतला जात आहे.

बांभोरीजवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुर्गादासगिरी गोसावी ( रा. पाचोरा) हे जागीच ठार झाले असून संदीप भीकन पाटील ( रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्गादासगिरी गोसावी यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते.

Copy