अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकळीतील पादचारी जखमी

0

चाळीसगाव – पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी (मॉर्निंग वॉक) फिरायला आलेल्या ४८ वर्षीय ईसमाला शहरातील टाकळी प्र चा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले असुन त्यांच्यावर येथील देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. तालुक्यातील टाकळी प्र चा येथील खरजई रोड बालाजी नगरातील रहीवासी निवृत्ती वासुदेव चित्ते (४८) हे २७ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी ( मॉर्निंग वॉक) भडगाव रोडवर टाकळी प्र चा येथे फिरायला रोडवर आले असता मागावुन अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला मार लागुन ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना येथील जयवंत देवरे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन उपचार सुरु आहेत. निवृत्ती चित्ते यांच्या डोक्याच्या पुढच्या भागाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असुन अजुन ते पूर्णपणे शुद्धीवर आले नसुन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. जयवंत देवरे यांनी दिली आहे.

Copy