अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जखमी

0

जळगाव – अशाबाबा नगरातून चिनार चौकाकडे जात असलेल्या दुचाकी धारकास अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीधारक गंभीर
जखमी झाला असून खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र अमृत झोपे (वय-40) रा.आशाबाबा नगर, कोल्हे नगर जवळ
हे आपल्या दुचाकीने सकाळी 12 वाजेच्या सुमारास घरून चिनार चौकातून जात असतांना अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने राजेंद्र झोपे
त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाला. बाजूला असलेले आर.एम.पाटील, मिलींद इंगळे, विजय मराठे आणि आर.एन.पाटील या
नागरीकांनी खासगी रूग्णालयात दाखल केले. अपघातबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

Copy