Private Advt

अज्ञात वाहनाची धडक : यावल तालुक्यातील शेतकर्‍याचा मृत्यू : वाहनचालकाविरोधात गुन्हा

जळगाव : जळगाव-पाचोरा रोडवर पायी जात असलेल्या भिका कडू महाजन (रा.टाकरखेडा, ता.यावल) या शेतकर्‍याला अज्ञात वाहनाने धडक देवून उडवल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना 2 डिसेंबर 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवार 7 जानेवारी रोजी सायंकाळी अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला.

पायी जात असताना अज्ञात वाहनाची धडक
जळगाव-पाचोरा रस्त्यावर पन्नालाल लाडवंजारी यांच्या शेतासमोर रस्त्यावर भिका कडू महाजन (टाकरखेडा, ता.यावल) हे 2 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. यात भिका महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संताजी पंडित लाडवंजारी (46, रा.मेहरुण, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.