Private Advt

अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत पाचोरा तालुक्यातील मजूर जागीच ठार

भुसावळ/पाचोरा  : अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील मजूर जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजता घडला. या अपघातात सुरेश गणपत देशमुख (40, कुर्‍हाड खुर्द) या मजुराचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव वाहनाने दिली धडक
गेल्या तीन वर्षांपासून पाचोरा येथील एका व्यापार्‍याकडे सुरेश देशमुख कामाला असून दररोज शेती कामासाठी सायकलवर अप-डाऊन करतात. रविवारी सायंकाळी 6.30 वाजता त्यांची सुट्टी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ते सायकलवरून घरी जाण्यासाठी निघाले असता सायंकाळी सात वाजता बिल्दी धरणावरुन जात असतांना जळगावकडून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने सायकलला धडक दिल्याने देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. मयत सुरेश देशमुख यांच्या पश्चात्य पत्नी, दोन लहान मुले, दोन भाऊ, एक बहिण असा परीवार आहे.