अज्ञात इसमाने केला मंदिरावरील साधूचा खून ; गुढे शिवारातील घटना

0

भडगाव- गुढे शिवारातील मंदिरावर वर्षभरापासून वास्तव्यास असलेल्या साधूचाच अज्ञात आरोपींनी खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मयताचे नाव मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी भडगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करणयात आला. गुरूवारी रात्री गुढे ते जुवार्डी रस्त्यावरील हाशाबाबा मंदिराजवळ 50 वर्षीय साधू रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचे प्रदीप सुभाष पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी भडगाव पोलिसांना माहिती दिली. मयत अनोळखी साधूच्या डोक्यावर लाकडी दांड्यो प्रहार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. चाळीसगावचे पोलिस उपअधीक्षक नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा माग काढण्यासाठी श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. अनोळखी मारेकर्‍यांचा शोध घेवून खुनाचा उलगडा करावा, अशी मागणी होत आहे.

Copy