अज्ञात इंडिगो कारच्या धडकेत तिघे जखमी

0

साक्री। शहरातील बस स्थानक परिसरात एका अज्ञात इंडिगो कार चालकाचा वाहनावरिल ताबा सुटल्याने रस्त्यावर चालणारे दुचाकीस्वार, सोडा विक्रेते यांच्या लॉरीला धडक देत जवळच्या दुकानाच्या ओट्याजवळ असलेल्या मोटार सायकलीवर जावून धडकली. यात राजाराम आत्माराम पाटील वय 60 रा. पोळाचौक, सुवर्णा मधुकर कुवर वय 27, मधुकर यशवंत कुकवर वय 56 दोघ रा. गोपाळनगर हे जखमी झाले.

जखमी रुग्णालयात दाखल
जखमींना स्वामी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून सोडून देण्यात आले. तर राजाराम पाटील यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या अपघातात कैलास वाघ यांची मोटरसायकल संजय बागुल यांची मोटारसायकल तसेच श्रीकृष्णा सोडा वॉटर यांच्या दुकानाचे आणि गाड्यांचे नुकसान झाले आहे.