अज्ञातांनी 13 दुचाकी वाहने पेटवली

0
खडकी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पाठोपाठ खडकीमध्येही वाहने पेटवुन देण्याचे लोण पसरले असुन रविवारी पहाटे अज्ञातांनी पाथरकर चाळ येथिल 13 दुचाकी वाहने पेटवुन दिली. या घटनेत 4 वाहने संपुर्णपणे जळुन खाक झाली. पाथरकर चाळ येथिल दारात उभ्या केलेल्या दुचाकी पेटवुन दिल्या आहेत.चाळीतील स्थानिक रहिवाश्यांनी जागरुकपणे एकत्र येऊन ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
खडकी पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक अमित गोरे तातडीने घटनास्थळी आले. घटनेची माहिती घेतली. यावेळी शेजारील सीसीटीव्हीचे फुटेज ही पाहण्यात आले. मात्र पोलिसांना आरोपींचा छडा लागु शकला नाही. यापुर्वी ही खडकीत काही गुंडांकडुन वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी या आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्याने अशा घटनांवर काही काळ नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश आले. मात्र काही गुंड प्रवृतींनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पोलिसांना वेळीच या गुन्हेगारांवर कायद्याचे अंकुश ठेवणे गरजेचे बनले आहे.
Copy