अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल

0

मुंबई: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या चार-पाच दिवसांपासून होम क्वारंटीनमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अजित पवारांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान आज सोमवारी अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोना झाला नसल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.