अजिंठ्याची चित्रे सांस्कृतिक इतिहास: कुलगुरू

0

चित्रकार कोल्हे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

जळगांव – “अजिंठ्याची चित्रशैली आणि त्याचा सूष्म अभ्यास करून चित्रकार लीलाधर कोल्हे यांनी प्रभावी रेखांकन केले आहे ,वाचकांपुढे एक भांडारच उपलब्ध केले आहे ,अभिजात कलेतून त्या काळाचे सांस्कृतिक ,आर्थिक,तसेच सामाजिक दर्शनच प्रतिबिंबित केले आहे, त्यांनी “अजिंठ्याचे किमयागार ” या पुस्तकाचे इंग्रजी भाषेतही पुस्तक काढावे ,जेणेकरून जगात ते नावलौकिक होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ.
पी.पी.पाटील यांनी व्यक्त व्यक्त केली ,त्यांच्या हस्ते “अजिंठ्याचे किमयागार या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते .

रिंगरोडवरील सुप्रसिद्ध पु.ना.गाडगीळ & संन्स येथील आर्ट ग्यालरीच्या सभागृहात हा समारंभ झाला , प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील ,माजी शिक्षणाधिकारी निलकंठराव गायकवाड ,धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे उपाध्यक्ष सुनील पाटील, अक्षरमुद्रा प्रिंटर्स चे संचालक संजय वाणी, कवी आणि कलावंत तुषार वाघुळदे यांच्यासह साहित्यिक प्रभात चौधरी,प्राचार्य राजेंद्र महाजन (चोपडा) जळगांव जिल्हा शिक्षक पातपेढीचे अध्यक्ष तथा राज्य कलाशिक्षक संघाचे राज्य सचिव शालिग्राम भिरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हे यांच्या कलाप्रवासात काढलेल्या काही निवडक चित्रांचे “चित्रकला प्रदर्शन” सुद्धा सुरू झाले आहे. पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील म्हणाले,मानवी संस्कृतीचा तसेच कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करता येणे हे महत्वाचे असते, त्यातूनच कसदार साहित्याची निर्मिती होत असते ,तर प्रसिद्ध कवीआणि मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स (कोल्हापूर) चे सचिव तुषार वाघुळदे यांनी सांगितले की ,चित्रकाराच्या हातात कुंचला असतो,तो सहसा लेखणीच्या वाटेला जात नाही, मात्र अवलिया कलावंत श्री. कोल्हे यांनी हा दुहेरी संगम साधला असून जिल्ह्याच्या सांस्कृतिक वाटचालीत त्यांनी महत्वाचा ठसा उमटवला आहे,जगण्याच्या पसाऱ्यातून साहित्य निर्माण होते,असे सांगून अजिंठ्याच्या चित्रांच्या निरीक्षणातून चित्रकार श्री. कोल्हे यांना जे दिसले ,जे गवसले, जे जाणवले ते अगदी सहज,सोप्या भाषेत मांडणी करून तत्कालीन सामाजिक जीवनाला स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रकाराने केला असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.माजी शिक्षणाधिकारी श्री.गायकवाड म्हणाले,कोल्हे सरांची अत्यंत अभ्यासूवृत्ती असल्यानेच हे परिपक्व पुस्तक साकारले असून याचा लाभ समस्त कलाशिक्षक ,अभ्यासक आणि पर्यटकांना निश्चितच होईल यात शंका नाही .

यावेळी कोल्हे यांनी मनोगतात सांगितले ,सेवानिवृत्तीनंतर मी अजिंठयाच्या चित्रशैलीचा बारकाईने अभ्यास केला, आणि ते सोप्या भाषेत लिहीत गेलो,कलेचा अभ्यास करणाऱ्यांना सदर पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे,”कलेचा ध्यास हाच माझा श्वास” असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. कार्यक्रमात साहित्यिक प्रभात चौधरी, कलावंत तुषार वाघुळदे आणि अरविंद नारखेडे यांनी विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी नाव देण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करून कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांचा शाल ,श्रीफळ आणि बुके देऊन खास गौरव केला ,कुलगुरू आणि पाहुण्यांनी चित्र प्रदर्शनातील अनेकविध चित्रांची बारकाईने पाहणी करून श्री.कोल्हे यांचे कौतुक केले.सर्व पाहुण्यांचे स्वागत लीलाधर कोल्हे ,सौ.नलिनी कोल्हे,अभियंता भूषण कोल्हे ,(पुणे ) प्रियंका कोल्हे,गार्गी कोल्हे यांनी केले. यापसंगी सेवानिवृत्त अभियंता दिलीप कोळंबे,सौ.ज्योती कोळंबे,कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एन. ओ.चौधरी ,कलाशिक्षक सुहास चौधरी,कवी गोविंद पाटील ,चित्रकार शाम कुमावत आदी उपस्थित होते ,स्वागत गीत विद्या भंगाळे यांनी सादर केले .

सूत्रसंचालन निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे यांनी केले आहेत.जळगावचे चित्रकार व शिल्पकार योगेश सुतार ,प्राचार्य जितेंद्र भारंबे यांचे अनमोल सहकार्य लाभले. आहे. चित्रकार कोल्हे यांना कलेच्या प्रदीर्घ सेवेबद्दल “खानदेश कला रत्न ” पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे .अजिंठ्याची चित्रेशिल्पे हा भारतीय सांस्कृतिक इतिहासातील एक चमत्कारच मानला जातो,वैशिष्ट्यपूर्ण नोंदी ,चित्रशैली ,अजिंठा चित्रकलेचे विषय साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती “अजिंठ्याचे किमयागार” या पुस्तकात देण्यात आली आहे .आभार भूषण कोल्हे यांनी मानले.कार्यक्रमास विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक,कला आणि साहित्यप्रेमी मंडळी उपस्थित होती.

Copy