Private Advt

अजिंठा हौसिंग सोसायटी येथे विवाहितेला मारहाण

 

जळगाव – कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केल्याची घटना घडली आहे. शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटी येथे २७ ऑक्टोबर रोजी ही घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, दिपीका सत्यजीत सोनवणे (वय-२५) रा. अजिंठा हाऊंसिंग सोसायटी जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीयू ४२८२) क्रमांकाची ज्यूपीटर दुचाकी आहे. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता त्या त्यांच्या घरी असतांना संशयित आरोपी सत्यजीत रविंद्र सोनवणे रा. वाघ नगर याने विवाहितेला काहीही कारण नसतांना मारहाण करून तिच्या ताब्यातील ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी व ३ हजाराचा मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर १५ दिवसांनी महिलेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सत्यजित रविंद्र सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.