अग्रवाल हॉस्पीटल जवळ ट्रकला रिक्षा धडकली

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वरील अग्रवाल हॉस्पीटल समोर भुसावळकडून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकला भरधाव वेगात असलेली रिक्षा मागून धडकली. यात रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यामुळे दोघा चालकांमध्ये बाचाबाची झाली अखेर वाद पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घातली.

अफरोज शेख याने ट्रक क्रं. एमएच.20.एटी. 7860 ह्यामध्ये माल लोड करून मुंबई येथे जाण्यासाठी सायंकाळी रवाना झाला. जळगाव शहरात दाखल झाल्यानंतर महामार्गालगत असलेल्या अग्रवाल हॉस्पीटल समोरून जात असतांना समोर गतिरोधक आल्याने त्याने ब्रेक मारला. परंतू मागून भरधाव वेगात येणार्‍या एमएच.19.व्ही.9272 ही रिक्षा मात्र ट्रकला जोरदार धडकली. या पाटोपाठ मागील कारही धडकली. या विचित्र अपघातात रिक्षाचे नुकसान झाले.