अखेर सर्व परीक्षा रद्द: व्यावसायिक अभ्यासक्रमाचाही सहभाग

0

मुंबई: संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन सुरू असून गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना देखील केल्या जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अव्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आली आहे.

Maharashtra Government has taken a decision to not conduct the final year/final semester examination of the non-professional courses as well as professional courses as the present atmosphere is not yet conducive to conduct any examination or classes. (1/3) https://t.co/ddS0zTRXQb

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून मागणी केली होती.

अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तो फॉर्म्युला ठरवावा आणि त्यानुसार गुण देण्याबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, परीक्षा न घेण्याबाबत सरकार दरबारी विचार सुरू होते. अखेर परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा वगळता अव्यवसायिक तसेच पदवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

Copy