अखेर महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप जाहीर !

0

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिले मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला झाले. मात्र खातेवाटप झाले नव्हते. अखेर खातेवाटप झाले आहे. खातेवाटप होत नसल्याने सरकारवर बरीच टीका देखील झाली. अखेर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:कडे सामान्य प्रशासन तसेच विधी व न्याय ही खाती ठेवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन हे खाते देण्यात आले आहे. अनपेक्षित म्हणजे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री यांना गृहखाते देण्यात आले आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात महसूल, तर अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असणार आहेत. कालपासून माध्यमांमध्ये चर्चेत असलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील महत्वाचे खाते देण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे. सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी आदिवासी विकास खाते काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य के. सी. पाडवी यांच्याकडे, तर सामाजिक न्याय खाते राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविले आहे.

अखेर महाविकास आघाडीच्या सरकारचे खातेवाटप जाहीर ! 1

नवनियुक्त मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप

१.उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

  1. अजित पवार,
    उप मुख्यमंत्री:वित्त, नियोजन
  2. सुभाष देसाई-उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
  3. अशोक चव्हाण
    सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून
  4. छगन भुजबळ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  5. दिलीप वळसे- पाटील-कामगार, राज्य उत्पादन शुल्क
  6. जयंत पाटील-जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  7. नवाब मलिक-अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
  8. अनिल देशमुख- गृह
  9. विजय उर्फ भाऊसाहेब थोरात-महसूल
  10. राजेंद्र शिंगणे-अन्न व औषध प्रशासन
  11. राजेश टोपे-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  12. हसन मुश्रीफ- ग्रामविकास
  13. नितीन राऊत- उर्जा
  14. वर्षा गायकवाड-शालेय शिक्षण
  15. डॉ.जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
  16. एकनाथ शिंदे-नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  17. सुनिल केदार-पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
  18. विजय वडेट्टीवार
    इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
  19. अमित देशमुख- वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
  20. उदय सामंत-उच्च व तंत्र शिक्षण
  21. दादाजी भुसे-कृषि, माजी सैनिक कल्याण
  22. संजय राठोड-वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  23. गुलाबराव पाटील-पाणी पुरवठा व स्वच्छता
  24. ॲड. के.सी. पाडवी-आदिवासी विकास
  25. संदिपानराव भुमरे-रोजगार हमी, फलोत्पादन
  26. बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील-सहकार, पणन
  27. ॲड. अनिल परब-परिवहन, संसदीय कार्य
  28. अस्लम शेख-वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
  29. ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)-महिला व बालविकास
  30. शंकराराव गडाख-मृद व जलसंधारण
  31. धनंजय मुंडे-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  32. आदित्य ठाकरे-पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

  1. अब्दुल नबी सत्तार
    महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
  2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील
    गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  3. शंभुराज शिवाजीराव देसाई
    गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
  4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
    जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
  5. दत्तात्रय विठोबा भरणे
    सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
  6. विश्वजीत पतंगराव कदम
    सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
  7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
    सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
  8. संजय बाबुराव बनसोडे
    पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
  9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
    नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10.श्रीमती आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क