अखेर बीसीसीआय बॅकफुटवर

0

नवी दिल्ली । बेगळुरू कसोटी सामन्यात कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरूध्द डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत मागितल्याच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी)कडे तक्रार केली होती. ती तक्रार बीसीसीआयने मागे घेतली आहे.कंगारू संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय मुख्यालयात राहुल जोहरी यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही संघाचे कप्तान रांचीमध्ये प्रत्यक्ष भेटून चर्चा करत या वादाला पुर्णविराम देतील असा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वादावर लक्ष केंद्रीत न करता कसोटी मालिकेवर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. दोन्ही कसोटी या राची व धर्मशाळा येथे होणार असल्याने सर्वांचे लक्ष या दोन सामन्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

लेव्हल दोनचा आरोप
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व पीटर हँड्सकोम्ब यांच्याविरुद्ध डीआरएससाठी ड्रेसिंग रुमकडून मदत मागितल्याच्या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केलेली तक्रार मागे घेतली आहे. बुधवारी भारतीय कर्णधार विराट कोहली व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करणार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. बीसीसीआयने तरीही कागदपत्रांसह या घटनेचे व्हीडिओ फुटेज आयसीसीला ई-मेल करत, जागतिक क्रिकेटचे संचालन करणार्‍या संस्थेच्या आचारसंहितेनुसार लेव्हल दोनचा आरोप निश्चित करण्यास सांगितले होते.

उर्वरित दोन कसोट्यांसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली । भारत व कंगारू संघात खेळल्या जाणार्‍या चार कसोटी सामन्यातील तिसरा व चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहिर करण्यात आला आहे.या कसोटी सामन्यातील शेवटच्या दोन सामन्यासाठी भारतीय संघात कोणतेच बदल करण्यात आले नाही आहे.दुखापत ग्रस्त हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

1-1 ची बरोबरी
या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीच्या आहेत.कंगारू ने पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 333 धावांनी पराभूत केले होते.तर भारताने याला प्रतित्तर देतांना बेगळुरू येथे कंगारूना 75 धावांनी पराभूत केले.तिसरी कसोटी 16 मार्चला राँची येथे तर चौथा कसोटी सामना 25 मार्चला धर्मशाला येथे होणार आहे. भारतीय संघात । विराट कोहली (कर्णधार ), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक ), उमेश यादव, इशांत शर्मा, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव और अभिनव मुकुंद यांचा सहभाग आहे.