अखेर पादचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव । पैसे कमी असल्यामुळे बिर्यानी न मिळाल्याने पायी घरी परतत असतांना तरूणास पप्पु ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने 13 फेब्रूवारी धडक दिली होती. त्यामुळे त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सोमवारी त्या 35 वर्षीय तरूणाचा रूग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सोमवारी 13 फेब्रूवारी रोजी 35 वर्षीय तरूण (पूर्ण नाव माहित नाही) हा बिर्यानी खरेदी करण्यासाठी गेला होता. परंतू जवळ पैसे कमी असल्यामुळे त्याला बिर्यानी खरेदी करता आली नाही. त्यामुळे तो पुन्हा आपल्या घराच्या वाटेवर पायी निघाला. या दरम्यान, तरूणाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात तरूण गंभीरज जखमी होवून बेशुध्द पडल्याने रस्त्यावर कोसळला. यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात तरूणाल उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सोमवारी 27 रोजी उपचार घेत असतांना तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास राजाराम पाटील हे करीत आहेत. यातच तरूणाची अद्याप ओळख पटली नसून त्याचे नाव व तो कुठला आहे याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस तरूणाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.