अखेर पडळकरांवर शरद पवारांचे भाष्य !

0

सातारा:- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या शैलीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला ज्यांना विधानसभा, लोकसभेला लोकांनी बाजूला केले आहे, अशा लोकांची नोंद घ्यायची आवश्यकता नसल्याचे त्यांनी पडळकरांचे नाव न घेता केली.

दरम्यान, भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे याविषयी स्वतः शरद पवार काय उत्तर देणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर, आज शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल असताना त्यांनी, पत्रकारांशी बोलताना यावर भाष्य केले.

Copy