अखेर नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर !

0

नवी दिल्ली: पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेले नागरिकत्व दुरूस्ती विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. विरोधकाच्या प्रचंड गदारोळात २९३ विरूद्ध ८२ मतांनी हा विधेयक मंजूर झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मांडल्यानंतर काँग्रेस, तृणमूल, एमआयएमसह विरोधी पक्षांनी याला विरोध केला. मात्र, हे विधेयक .००१ टक्केही अल्पसंख्याकाविरोधी नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. त्यानंतर हे विधेयक मांडण्यासंदर्भात मतदान घेण्यात आले.

लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर आक्षेप घेत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली.

हे विधेयक म्हणजे घटनेतील १४व्या कलमाचे उल्लघंन करणारे आहे, असे आरोप विरोधकांनी केले.

Copy