अखेर दहावीची परीक्षा रद्द !

देशात करोनाचा कहर लक्षात घेता आत्ता आयसीएसई (ICSE) बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा होतात कि नाही ? याकडे विद्यार्थ्याचे व पालकांचे लक्ष लागले आहे.

दहावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली असली तरी बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसंच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात येईल असे आयसीएसईकडून सांगण्यात आले आहे.