अखेर जिल्हाधिकार्‍यांची बदली

0

जळगाव । जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांचा तीन वर्षाचा काळ संपल्यानंतर त्यांच्य बदलीचे वारे गेल्या आठवड्यापासून जोरदार चर्चा सुरू होत्या. योगायोगानुसार बुधवार 8 मार्च रोजी महिला दिनाच्या मुहुर्तावर त्याच्या बदलीचे आदेश दुपारी प्राप्त झाले.

जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या बदलीवर नूतन जिल्हाधिकारी म्हणून किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. किशोर निंबाळकर हे सध्या ठाणे येथील जिल्हा परीषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, पुणे जिल्हातील पिंपरी-चिचवड नंतर ठाणे येथे आपला कामाचा ठसा उमटविला. त्यांनी उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णयाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.