अखेर आयपीएलला स्पॉन्सर मिळाला; बीसीसीआयने केली अधिकृत घोषणा

0

नवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाच्या टायटल स्पॉन्सरशिप Dream 11ला मिळाली आहे. आज बुधवारी १९ रोजी बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. ड्रीम 11ही भारतीय कंपनी आहे आणि तीचे मूळ महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. यापूर्वी ही स्पॉन्सरशिप vivoकडे होती. मात्र चीनी कंपनीवर बहिष्कार घालण्याची मागणी होत असल्याने vivoकडील स्पॉन्सरशिप काढून घेण्यात आले.

स्पॉन्सरशिपसाठी ड्रीम 11नं 222 कोटींची बोली लावली, तर अनअकॅडमीनं 210, टाटा सन्सनं 180 आणि बायजूनं 125 कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ड्रीम 11ने बाजी मारली. ड्रीम 11 ही चायनीस कंपनी आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. ड्रीम 11वा टर्न ओव्हर 736 कोटींचा आहे. मुंबईतील हर्ष जैन व भावीत सेठ यांनी 2012मध्ये ही कंपनी सुरू केली. 2019मध्ये ही कंपनी भारतातील पहिली गेमींग कंपनी बनली.