अखेर ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक मागे; लेखकांनी मागितली माफी !

0

नवी दिल्ली: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात भाजपचेच पदाधिकारी जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले. यावरून देशभरात वाद निर्माण झाले आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही असे म्हणत अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष केले आहे. दरम्यान आता पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक मागे घेतले असून त्यांनी माफी देखील मागितली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. लेखकांनी पुस्तक मागे घेऊन माफी मागितल्याने आता हे प्रकरण संपले आहे असे जावडेकर यांनी सांगितले. या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. या पुस्तकावरून देशभरातील विरोधकांनी भाजपला लक्ष केले होते. तातडीने हे पुस्तक मागे घेण्यात यावे अशी मागणी होत होती. अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे.

पुस्तकाबद्दल वाद सुरु असतानाच पुस्तकातील एका प्रकरणावरून नवीन वाद समोर आला आहे. पुस्तकातील एका प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शारीरिक समानता असल्याचे दाखविण्यात आले आहे. शिवाजी महाराज आणि मोदींच्या शरीर बांधणी एकाच प्रकारची असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Copy